---Advertisement---

धक्कादायक : प्रियकराने पाच गोळ्या घालून प्रेयसीची केली हत्या

By team
On: January 29, 2024 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील पिंपरी येथे प्रियकराने अभियंता प्रेयसीला लॉजवर नेऊन गोळ्या झाडल्या. यात तरुणीचा मृत्यू झाला. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंट ओयो टाउन हाउसमध्ये रविवारी (दि. २८) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वंदना के. द्विवेदी (२६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ऋषभ निगम आणि वंदना यांचे घर लखनौ येथे एकाच परिसरात आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख असून, काही वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. सॉफ्टवेअर अभियंता असलेली वंदना ही २०२२ मध्ये हिंजवडी येथे नोकरीनिमित्त आली. ती एका आयटी कंपनीत नोकरीला होती. ऋषभ गुरुवारी (दि. २५) लॉजमध्ये गेला, तर वंदना शुक्रवारी तेथे आली. शनिवारी (दि. २७) रात्री ऋषभने वंदनावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर तो पळून गेला. माहिती मिळताच हिंजवडी पोलिस दाखल झाले. हॉटेलकडील मास्टर चावीने खोलीचे कुलूप उघडले. त्यावेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पळून गेलेल्या क्रषभने मुंबई गाठली. खुनाबाबतची माहिती मुंबई पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ऋषभला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने खून केल्याचे सांगितले. याबाबत मुंबई पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!