---Advertisement---

ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात : मायलेकाचा जागीच मृत्यू

By team
On: February 6, 2024 1:15 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावरील अपघाताची घटना नियमित घडत असतांना अनेक वाहनधारकांना आपल्या परिवारातील सदस्यांचा जीव गमवावा लागत आहे. नुकतेच कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील माऊली फाट्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झालीय. या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या मायलेकांचा मृत्यू झालाय. हि घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.

या भीषण अपघातात भागवत उर्फ पप्पू सुभाष इंगळे (वय 22) मालन सुभाष इंगळे (वय 47 रा.राजेगाव) असे मयत मायलेकराची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने राजेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!