---Advertisement---

कारचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून कोसळली : ५ जणांचा जागीच मृत्यू

By team
On: February 9, 2024 11:42 AM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच नांदेड जिल्ह्यातून एक भयानक अपघात घडला आहे. भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळील कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पुलावरून खाली कोसळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने रब्बी पिकांच्या रक्षणासाठी जवळच्या शेतात असलेले मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी वेळेवर मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. तसेच अपघाताची माहिती भोकर पोलिसांना दिली.

सविता श्याम भालेराव (वय २५), प्रीती परमेश्वर भालेराव (वय ८) सुशील मारोती गायकवाड (वय ९) रेखाबाई परमेश्वर भालेराव(वय ३०),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(वय २८) अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती भोकर तालुक्यातील रेणापूर गावातील रहिवासी आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहत होते .

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!