---Advertisement---

सोलापूर : शिक्षकाने वयोवृध्द महिलेस केली प्रेमाची मागणी

By team
On: March 11, 2024 10:02 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

‘पाटील’ नामक एका शिक्षकाने घरी एकटीच राहत असलेल्या एका वयोवृध्द महिलेस व्हिडीओ करून, अश्लील मेसेज पाठवत प्रेमाची मागणी केली. याबाबत त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार करीन असे म्हटले असता, मी केस लढायला तयार आहे, अशी धमकी दिली. याप्रकरणी ‘त्या’ शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील अभागी वयोवृध्द महिला विजापूर रोड परिसरातील एका नगरात वास्तव्यास असून ती एका ठिकाणी कामाला जाते. २८ नोव्हेंबर २०२० रोजी ‘त्या’ शिक्षकाने ‘त्या’ महिलेस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यादिवसापासून वारंवार मोबाईलवर अश्लील मेसेजेस् पाठवून देत होता. असले मेसेजेस् पाठवू नका म्हणून ‘त्या’ महिलेने ‘त्या’ शिक्षकाकडे वारंवार विनवणी करायची. पोलिसात तक्रार करते, असे म्हटले असता मी पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षक आणि सांगलीचा रहिवासी आहे. कुठे जायची तिथे जा अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!