---Advertisement---

अक्कलकोटचे नवे गटविकास अधिकारी शंकर कवितके

By team
On: March 12, 2024 8:46 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोटच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी शंकर कवितके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांची काही दिवसापूर्वी इंदापूर येथे बदली झाल्याने ही जागा रिक्त होती.

Watch Our Latest Video

मागच्या दहा दिवसांपासून या ठिकाणचा पदभार दक्षिणचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्याकडे होता. नूतन गटविकास अधिकारी कवितके हे येत्या एक ते दोन दिवसात अक्कलकोट पंचायत समितीचा पदभार घेण्याची शक्यता आहे. कवितके हे अतिशय कडक आणि शिस्तीचे अधिकारी असून शिरोळ येथील पंचायत समितीमध्ये त्यांनी त्याठिकाणची पूरस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली होती.

स्थलांतरित लोकांना निवारा केंद्र तसेच त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात त्यांचा मोठा हातभार लागला होता.कवितके हे मूळचे तसे बारामतीचे असून गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिले दोन वर्ष त्यांनी शिरोळ पंचायत समिती येथे उत्कृष्ट पद्धतीने काम केले आहे.त्यानंतर दुसरी नियुक्ती अक्कलकोट येथे झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!