---Advertisement---

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व्यवस्थापन उत्कृष्ट – पराग वाकडे

By team
On: March 26, 2024 9:01 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून उदयास येत आहे याचे भान ठेवून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह सर्व विश्वस्त पदाधिकारी अत्यंत विनम्रपणे भाविकांना सेवा देत आहेत,असे मत मुंबई येथील मंत्रालयातील समाज कल्याण विभागाचे अव्वर सचिव पराग वाकडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच सपत्नीक येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्यावतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे यांनी पराग वाकडे व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. स्वामी दर्शनापासून धार्मिक उपक्रम भाविकांना लागणारी कोणतीही तात्काळ मदत, गर्दीमध्ये वयोवृद्ध व विकलांग स्वामी भक्तांना तात्काळ स्वामी दर्शनाची सोय इत्यादी बाबी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे व्यवस्थापन संदर्भात असलेले वेगळेपण सिद्ध करीत आहेत.

त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट पद्धतीचे आहे,असेही ते म्हणाले.याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,बाळासाहेब एकबोटे, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे सदस्य संतोष जाधव-फुटाणे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!