---Advertisement---

अलगुड येथे २२७ व्या नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ

By team
On: March 27, 2024 9:30 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

औसा येथील अद्वैत धर्मप्रसारक, सद्‌गुरु सांप्रदायिक धर्मपीठ म्हणून सर्वपरिचित असलेल्या सद्‌गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचा यंदाचा २२७ वा नाथषष्ठी महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला असून तो ३ एप्रिल पर्यंत चालणार आहे.हे सर्व कार्यक्रम श्री क्षेत्र अलगुड (ता. बसवकल्याण) येथे पीठाधिपती गुरुबाबा महाराज औसेकर व सद्‌गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली होणार असून या महोत्सवात सत्संग, चक्रीभजन, धर्मसभा व नामसंकीर्तन सोहळा पार पडणार आहे.

औसा येथील नाथ संस्थानाचे तृतीय सत्पुरुष सद्‌गुरु दासवीरनाथ महाराज यांनी अलगुड येथील श्री एकनाथ मंदिरात सुरु केलेल्या अखंड नामस्मरण व वीणा पहारा यास १०० वर्षे पूर्ण झाले असून, अलगुड येथे हा शतकपूर्ती वर्षाचा १२ वा नाथषष्ठी महोत्सव यंदा होत असून, यंदाचा नाथषष्ठी महोत्सव संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तुकाराम बीज दिनापासून सुरू झाला आहे. या महोत्सवात सकाळी तुकाराम बीजनिमित्त माधव महाराज स्वामी सलगरकर यांचे गुलालाचे कीर्तन कार्यक्रम पार पडले. २८ रोजी रात्री ९ वा. हभप योगीराज महाराज गोसावी, २९ रोजी रात्री ९ वा. एकनाथ महाराज हांडे, ३० रोजी सद्‌गुरु गुरुबाबा महाराज औसेकर, ३१ रोजी शरदचंद्र महाराज देगलूरकर, १ एप्रिल रोजी सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, २ रोजी चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे. ३ एप्रिल रोजी दु. १ वा. हजेरीचे कीर्तन होऊन सायंकाळी ५ वा. अबीर, बुक्का गुलालाची उधळण करीत गोपाळकाला भाविकांना दिला जाणार आहे. तसेच १ एप्रिल रोजी रात्री ८.३० वा. श्रीश्रीश्री १००८ काशी जगद्‌गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, श्री १०८ ष.ब्र.डॉ. चन्नवीर शिवाचार्य स्वामी यांच्या प्रमुख उपस्थिती आशिर्वचन कार्यक्रम होणार आहे.

सोहळ्यात नित्य काकड, श्री विष्णुसहस्त्रनाम, गंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, श्री नाथ स्थापनेची पूजा, मल्लनाथ गाथ्यावरील भजन, आरती व दिंडी, हरिपाठ, श्री नाथ स्थापनेची पूजा, चक्रीभजन व ज्ञानेश्वरी प्रवचन, कीर्तन व हरिजागर नित्य होणार आहेत. नाथषष्ठी महोत्सवास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नाथ संस्थानने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!