---Advertisement---

आजीने पैशांसाठी चार वर्षाच्या नातीला विकले

By team
On: March 27, 2024 10:21 AM
Follow Us:
---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था

पैशांसाठी सख्ख्या चुलत आजीनेच चार वर्षांच्या नातीचे अपहरण करून तिला ५ हजार रुपयांत विकले. सोमवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्तअसे कि, मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ हुल्लाळे (५०) हिने मुलीची चुलत आजी सलीमा बेगम अजीज खान (४८, रा. मिसारवाडी) हिच्याकडून तिला विकत घेतले. सिटी चौक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सलीमा व अलकाचा शोध घेत दोघींना अटक केली. न्यायालयाने दोघींना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चार वर्षांची रिहाना (नाव बदलले आहे) आजी, मामासोबत रोजाबाग परिसरात राहते. २४ मार्च रोजी दुपारी रिहाना परिसरात अन्य मुलांसोबत खेळत होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. ती न सापडल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सिटी चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!