---Advertisement---

नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी

By team
On: March 28, 2024 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती : वृत्तसंस्था

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. बुधवारी सायंकाळी जाहीर केलेल्या राज्यातील तिसऱ्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने राज्यात आजवर ४८ पैकी आपले २४ उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपसह सर्वच मित्रपक्षांतील नेत्यांनी राणा यांना विरोध केल्यानंतरही भाजप नेतृत्वाने राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले हे विशेष. महायुतीतील शिवसेना नेता आनंदराव अडसूळ यांच्यासह प्रहार संघटना पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी राणा यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!