---Advertisement---

आ.प्रणिती शिंदे प्रचारासाठी तीन दिवस अक्कलकोट तालुक्यात

By team
On: March 28, 2024 4:20 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील गावभेट दौरा २९ मार्च ते ३१ मार्च या दरम्यान होत असल्याची माहिती माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा परिषद गटनिहाय त्या भेट देत असुन काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी केले आहे.चप्पळगांव, सलगर आणि जेऊर जि.प गटातील ५४ गाव भेट करुन सलगर, चुंंगी व जेऊर येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.

यावेळी जेष्ठ नेते अशपाक बळोरगी, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील ,काँग्रेसचे शहर अध्यक्ष रईस टिनवाला,महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा शीतल म्हेत्रे, दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख आनंद बुक्कानूरे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष राम जाधव ,मल्लिकार्जुन काटगाव,सिद्धार्थ गायकवाड,व्यंकट मोरे, सिद्धाराम गुब्याड, मल्लिनाथ भासगी ,सैपन फुलारी,विजय कदम यासह आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.आमदार प्रणिती शिंदे यांचा अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील गावभेट दौरा खालीलप्रमाणे आहे.

२९ मार्च रोजी तोळणूर / सलगर जि. प. गटामध्ये (कंसात वेळ) हैद्रा ( सकाळी ८ वाजता ),तोळणूर(स.८.३० वा.), उडगी (स.९ वा.), कलप्पावाडी(स.९.३० वा.)सातनदुधनी(स.१० वा.), तळेवाड(स.१०.३० वा.), बबलाद( स.११ वा.) आंदेवाडी ज.( दु.१२.३० वा.), सिन्नर( दु.१ वा.), दुधनी तांडा (ग्रा.)( दु.१.३० वा.), मुगळी( दु.२ वा.), इब्राहिमपुर( दु.२.३० वा.)नागुर( दु.३ वा.),मिरजगी( दु.३.३० वा.),बोरीउमरगे( दु.४ वा.), हत्तीकणबस( सायं.४.३० वा.), चिक्केहळ्ळी( सायं.५ वा.), सलगर सायं.५.३० वा. येथे वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे.शनिवार ३० मार्च रोजी चपळगांव जि. प. गटामध्ये गावभेट दौरा असुन दहिटणवाडी( स.८ वा.), चपळगांववाडी(स.८.३० वा.), चपळगांव(स.९ वा.), ब-हाणूपर( स.९.३० वा.), डोंबरजवळगे (स.१० वा.),बोरगांव(स.१०.३० वा.), दर्शनाळ( स.११ वा.), अरळी( स.११.३० वा.),नन्हेगांव (दु.१२ वा.), पितापुर(दु.१.३० वा.), हन्नूर( दु.२ वा.), किणी(दु.३ वा.), काझीकणबस ( दु.३.३० वा.), किणीवाडी(दु.४ वा.)पालापुर ( सायं.४.३० वा.), बादोला(सायं.५ वा.), कुरनूर( सायं.६ वा.), मोट्याळ( सायं.६.३० .),सिंदखेड( सायं.७ वा.),चूंगी सायं ७.३० वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे.

रविवार ३१ मार्च रोजी जेऊर जि. प. गटात
सुलेरजवळगे ( स.८ वा.), चिचांळी न. (स.८.३० वा.),केगांव बु.(स.९ वा.), कोर्सगांव( स.९.३० वा.), मुंढेवाडी( स.१० वा.), तडवळ( स.१०.३० वा.), खानापूर( स.११ वा.), म्हैसलगी ( स.११.३० वा.), मंगरुळ ( दु.१२ वा.), देवीकवठे ( दु.१.३० वा.), कुडल( दु.२ वा.), आंदेवाडी बु.( दु.२.३० वा.),हिळ्ळी( दु.३ वा.), शावळ ( दु.३.३०),गोडगांव बु( दु.४ वा.), जेऊरवाडी(दु. ४.३० वा.), करजगी ( सायं.५ वा )व जेऊर येथे साडेपाच वाजता जाहीर सभेने गावभेट दौरा सांगता होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!