---Advertisement---

अनैतिक संबंधाचा संशय : पत्नीसह प्रियकराचा खून

By team
On: April 11, 2024 9:27 AM
Follow Us:
---Advertisement---

भंडारकवठे : वृत्तसंस्था

पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने मारून खून केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी (दि.१०) दुपारी बरूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील सलगरे वस्ती येथे घडली. या घटनेतील संशयित आरोपी असलेला पती फरार झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बरूर आणि नांदणीच्या शिवेवर शिवारात सलगरे वस्ती आहे. याच वस्ती परिसरात राहणाऱ्या एका महिलेबरोबर (वय २९, रा. बरूर) येथीलच नांदणीच्या नरोटे वस्ती येथे राहणाऱ्या एका इसमाचे (वय २२, रा. नरोटे वस्ती, नांदणी) अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेच्या पतीने (वय ३५, रा. बरूर) पत्नी व तिचा संशयित प्रियकर यांचा खून केला असून या घटनेतील मृत तरुण अविवाहित होता.

या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याची कुणकुण मृत महिलेच्या पतीला लागली होती. दरम्यान, या दोघांनाही समजावून सांगण्यात आले होते. तरी पण या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु असल्याच्या संशयावरुन सदर पतीने पत्नीला काही दिवस माहेरी सोडले होते, अशी चर्चा गावात सुरू होती. यानंतर काही दिवसांनी माहेरकडील मंडळींनी दोघांनाही समजावून सांगून तिला पतीकडे आणून सोडले होते. मात्र, परत त्यांच्यातील संबंध तसेच कायम राहिल्याचा राग पतीला होता. म्हणून आज भर दुपारी महिलेच्या पतीने दोघांच्या शरीरावर कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर आणि शरीराच्या अन्य भागावर मारून गंभीर स्वरूपात जखमी करून दोघांना जिवे ठार मारले.

ही घटना बुधवारी दुपारी घडल्याची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, सहायक फौजदार संदीप काशीद, सागर चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि विनाविलंब तपास सुरू केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. या गंभीर घटनेचा रात्री उशिरापर्यंत मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!