---Advertisement---

जन्मदात्याचे कृत्य : दीड वर्षाच्या चिमुकलीला संपविले

By team
On: April 12, 2024 9:16 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीची निर्दयीपणे हत्या केल्याचा प्रकार मुंब्रा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या मुलीला कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला, असे आईवडिलांना वाटत होते. मात्र पोलीस उपायुक्त कार्यालयाला एक निनावी पत्र आले, त्यामध्ये मुलीचे छायाचित्र व तिची हत्या झाल्याचा उल्लेख होता. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून कब्रस्तानमध्ये दफन केलेला मुलीचा मृतदेह उकरून काढला व तिच्या आईवडिलांकडे चौकशी केली. त्यामध्ये जन्मदात्या आईवडिलांनीच चिमुकलीची हत्या केल्याचे समोर आले.

मुलीच्या डोक्यावर घाव दिसून आले असून तिच्या दुसऱ्या बहिणीची जीभ देखील अर्धवट कापल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासानुसार, अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलीस इतर शक्यता पडताळून पाहत आहेत. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी शिवाजी नगर परिसरात राहणारा मुलीचा पिता जाहिद शेख व आईला अटक केली आहे. १८ मार्चला मुलीला उपचारांसाठी डॉक्टरकडे नेण्यात आले होते. मात्र तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. आरोपी मूळ झारखंडचे आहेत. काही महिन्यांपूर्वीच ते मुंब्यामध्ये आले आणि भाड्याने राहत होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!