---Advertisement---

अक्कलकोट शहरात हत्तीरोग व मतदार जनजागृती रॅलीला प्रतिसाद

By team
On: April 26, 2024 9:32 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

हत्तीरोग नियंत्रण पथक व आरोग्य विभाग पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी अक्कलकोट शहरामध्ये हिवताप व हत्तीरोग जनजागृती व मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थी रॅली काढण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.जागतिक हिवताप दिनाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या उपक्रमाचा एक भाग होता.

Watch Our Latest Video

अक्कलकोट शहरातून पंचायत समिती, हनुर चौक, कारंजा चौक,फत्तेसिंह चौक, ए-वन चौक ,विजय कामगार चौक येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीसाठी कल्याणशेट्टी शाळेतील विदयार्थी व खेडगी शाळेचे विद्यार्थी व एनसीसी ग्रुप उपस्थित होते. या रॅलीसाठी गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे ,हत्तीरोग अधिकारी के. एस. मंजुळ यांच्या उपस्थितीत अक्कलकोट शहरात पंचायत समिती येथून हिवताप जनजागृती व मतदार जनजागृती रॅली संपन्न झाली. यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांचे सहकार्य लाभले.सदर रॅलीसाठी सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच खेडगी प्रशाला अक्कलकोटमधील एनसीसी ग्रुप व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी नागरिकांना आरोग्य शिक्षण,म्हणी आणि स्लोगन तसेच पोस्टर बॅनर याद्वारे आरोग्य शिक्षण व मतदार जनजागृती करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!