---Advertisement---

किरकाेळ कारणावरून जवानाची निर्घृण हत्या

By team
On: May 3, 2024 4:04 PM
Follow Us:
---Advertisement---

परभणी : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात किरकाेळ कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या एका जवानाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली.

अजगर खाजा शेख (वय 33) असे मृत जवानाचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी पाेलिसांनी चाैघांना अटक केल्याची माहिती परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसींग परदेशी यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजगर खाजा शेख हे सकाळी नाष्टा करण्यासाठी जिंतूर शहरातील एका हॉटेल मध्ये गेले होते. नाष्टा लवकर देण्याच्या वादावादीत हॉटेल मालक व अजगर खाजा यांचा वाद झाला. त्यात हॉटेल मालक शेषेराव आव्हाड व त्याचा मुलगा अमोल तसेच हॉटेल मधील दोन कर्मचाऱ्यांनी अजगर खाजा यांना लाकडी दाड्यांनी बेदम मारहाण केली. त्यात खाजा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या गुन्हा नाेंदवीत त्यांना अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत शेषेराव आव्हाड, अमोल आव्हाड, बालाजी रणखंबे, इम्रान करेशी अशी अटक केल्यांची नावे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!