---Advertisement---

रात्रीच्या सुमारास वंचितच्या उमेदवारावर हल्ला

By team
On: May 8, 2024 3:30 PM
Follow Us:
---Advertisement---

शिर्डी : वृत्तसंस्था

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्यारात्रीच्या सुमारास वंचितच्या उमेदवारावर हल्ला टप्प्यासाठी नुकतेच मतदान झाले असून मात्र, त्याआधीच मध्यरात्री अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर सोमवारी रात्री हल्ला झाला आहे. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ ही घटना घडली आहे. हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्षा रूपवते यांना काही झाले नाही, परंतु त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभेतील वांचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या त्यांचा प्रचार दौरा आटोपून परत येत होत्या. रात्री 10 वाजता प्रचार सभा आटोपून त्या अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आल्या. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. हल्ला करणारे दोन जण असल्याचे सांगितले जात आहे. या दगडफेकीत गाडीच नुकसान झाले. सुदैवाने रुपवते यांना काहीच झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक पांडूरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्याचवेळी वंचित आघाडीचे कार्यकर्ते आले. या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांना पोलिसांनी आणि उत्कर्षा रुपवते यांनी शांत केले.हल्ल्यासंदर्भात बोलताना उत्कर्षा रुपवते म्हणाल्या, मी प्रचार पूर्ण करुन येत होते. गाडीत फोनवर बोलत असताना काही तरी आपटल्याचा आवाज आला. त्यावेळी पावडर तोडांत गेली. गाडीच्या काही काचाही उडल्या. सुदैवाने या काचा डोळ्यात गेल्या नाही. सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते मी सुखरुप आहे. कार्यकर्त्यांनी आपला प्रचार सुरु ठेवावा. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!