ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हाके, वाघमारेंच्या भेटील सरकारचे ५ मंत्री शिष्टमंडळासह दाखल

वडीगोद्री : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरु केले असून सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्रीमध्ये दाखल झाले होते. मागील दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, हे शिष्टमंडळ दाखल होताच उपोषणस्थळी एकच गर्दी उसळली. या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. ओबीसी नेत्यांसोबत काल राज्य सरकारसोबत बैठक झाली. त्यानंतर सरकारचा निरोप घेऊन हे शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, हाके यांच्या भेटीला उपोषणस्थळी जाण्यापूर्वी हे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरले. यावेळी सर्व मंत्र्यांनी विमानतळावर चर्चा केली. छगन भुजबळ या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासह इतर नेत्यांनी देखील उपोषणस्थळी जाण्यापूर्वी चर्चा केली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!