---Advertisement---

सोलापूर-पुणे बायपासवर वाहनाचा विचित्र अपघात : दोन ठार तर दोन गंभीर

By team
On: June 22, 2024 2:47 PM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही वर्षापासून अपघाताच्या नियमित मालिका सुरु असतांना नुकतेच अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, सोलापूर-पुणे-कल्याण बायपासवर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुरुवातीला बायपासवर ट्रेलर आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यानंतर अपघातग्रस्त ट्रेलरला एका कारने मागून धडक दिली. या भीषण अपघातात ट्रेलर आणि ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे बायपास रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!