---Advertisement---

मनसेचे पुन्हा खळखट्याक : उत्तर भारतीय तरुणाला केली मारहाण

By team
On: June 22, 2024 2:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात पुन्हा एकदा मनसेने काल रात्री नवी मुंबईत उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात उत्तर भारतीयाला मारहाण करणारे राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. तर व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्रथम उत्तर भारतीय तरुणाला शिवीगाळ करताना आणि नंतर मारहाण करताना दिसत आहे.

यात त्या तरुणाला ‘मराठी कसे बोलावे ते कळत नाही’ असेही बोलताना दिसत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. मात्र, नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे किंवा नेमका कोणत्या ठिकाणाचा आहे, या बाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लोकसभा निवडणुकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता. त्या वेळी देखील उत्तर भारतीय मतदार नाराज झाल्याची चर्चा होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यात अशा प्रकारच्या घटनांमुळे याचा परिणाम महायुतीवर देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!