---Advertisement---

एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले ; अनेक जखमी

By team
On: July 18, 2024 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्याचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. संबंधित घटनेचा तपशील अपडेट होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!