ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्वांसाठी अभिमानाचा आजचा दिवस ; मुख्यमंत्री शिंदे ; ‘वाघनखं’ प्रदर्शनाला सुरुवात

सातारा : वृत्तसंस्था

आजपासून साताऱ्यात छत्रपती शिवरायांची ‘वाघनखं’ प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखे महाराष्ट्रात पोहोचली आहेत. या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांचे देखील प्रदर्शन केले जाणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती. यावेळी सोहळ्याला येताच मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवरायांना अभिवादन केले. तसेच तिथे उपस्थित महिलांनी या तिघांना राखी बांधली. यावेळी शिंदे, फडणवीस, पवारांच्या हस्ते वाघनखांसह इतर शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. शिवकालीन वाघनखांची पहिली झलक यावेळी समोर आली आहे.

यावेळी शिंदे म्हणाले, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे. हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. शिवरायांची वाघनखे हे शौर्याचे प्रतीक आहे त्याचे दर्शन शिवभक्तांना घेता येणार आहे. तसेच खोट्या वाघनखांना खऱ्या वाघनखांची काय समज असणार असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांकडून सातत्याने ही खोटी वाघनखे असल्याची टीका केली जात आहे.

यावेळी ओपन जीपमधून शिंदे, फडणवीस आणि पवार संग्रहालयाकडे पोहोचले. महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. तसेच शिवभक्तांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. ओपन जीपमधून जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सातारकरांचे अभिवादन स्वीकारत महायुतीचा रोड शो पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!