अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
थायलंड येथील बँकौक बँक केमिकल सोसायटी आणि बेंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेची शाखा जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्मॉल स्केल रसायनशास्त्र कार्यशाळेचे आयोजन बेंगलोर येथे २० व २१ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
या कार्यशाळेत नागनहळळी आश्रमशाळेतील विज्ञान शिक्षक शंभुलिंग बशेट्टी व प्रा.रविंद्र नवले यांनी सहभाग घेतला.भारतरत्न पुरस्काराने सन्मानित असे शास्त्रज्ञ सी.एन.आर राव यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसायनशास्त्र विषयात झालेले बदल व विविध सूक्ष्म प्रात्यक्षिकाच्या सहाय्याने पडताळणी याविषयी थायलंड येथील शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. भारतातील विविध राज्यातील १०८ शिक्षक या कार्यशाळेत उपस्थित होते.
या प्रशिक्षणासाठी जवाहर महाविद्यालय अणदुरचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रा.नवले व शिक्षक बशेट्टी हे प्रशिक्षणास उपस्थित राहून उत्कृष्टरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे सचिव जावेद पटेल, प्राचार्य मुजावर आय एम मुख्याध्यापक रईस शेख यांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.