---Advertisement---

सोलापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा दुर्देवी मृत्यू

By team
On: August 30, 2024 10:22 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील हैदराबाद रोड महामार्गावरून चंदन काट्याजवळ दि.२९ ऑगस्ट रोजी भरदुपारी भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ज्योती यशवंत बडगंची (वय ५०, रा. दत्तनगर, सोलापूर) व जयंती कमलाकर उदगिरी (वय ५३, रा. सैफुल, सोलापूर) अशी या दोन बहिणींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही कामानिमित्त विडी घरकुलला मोपेड(एमएच १३ बीटी ४३३५) वरून ज्योती बडगंची व जयंती उदगिरी या दोघी बहिणी गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या दुपारी ३ वाजता विडी घरकुलमार्गे हैदराबाद रोड महामार्गावरून बोरामणी चौकाकडे येत होत्या. चंदन काट्याजवळ त्या आल्या असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १० झेड २६३९) ट्रकची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली.

या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत दोघींना शासकीय रुग्णालयात दाखल असता ज्योती बडगंची यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. तर जयंती कमलाकर यांचा उपचारादरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!