---Advertisement---

हसापुरच्या जळीतग्रस्त कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीची मदत

On: December 16, 2020 11:50 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटकडून हसापुर येथील घर जळीत प्रकरणांमधील नुकसानग्रस्त कुटुंबाला किराणा मालाची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

दहा दिवसापूर्वी शॉर्टसर्किटमुळे दुपारगुडे यांच्या घराला आग लागली होती. त्या आगीमध्ये नवीन लग्न झालेले संपूर्ण सामान जाळून खाक झाले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या अक्कलकोटच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून माणुसकीच्या नात्याने दुपारगुडे कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण किराणामाल त्या कुटुंबाला आज वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्यावतीने देण्यात आला.यावेळी हसापुरचे सरपंच स्वामी,उपसरपंच सागर घटकांबळे, चंद्रशेखर मडीखांबे, सिद्धार्थ बनसोडे ,राहुल मोरे ,मल्लिनाथ पाटील, मराप्पा शिवशरण, शिवाजी चौगुले, विनोद मडीखांबे यांच्यासह दुपारगुडे कुटुंब यावेळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!