ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ७३१ प्रकरणे निकाली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण ७३१ प्रकरणे निकाली काढण्यात येवून विविध विभागाची सुमारे ९२ लाख ७ हजार ३९२ इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली,अशी माहिती अक्कलकोट तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एम. एम कल्याणकर यांनी दिली.

या राष्ट्रीय लाेकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम.एस आझमी तसेच जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पॅनलची स्थापना करण्यात आली होती.सदर पॅनलमध्ये दिवाणी न्यायाधीश क.स्तर एम.एम. कल्याणकर यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.सदर लोकअदालीतमध्ये ७२ प्रलंबित प्रकरणे व ६५९ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.या लोकअदालतीमध्ये पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय पाटील,सरकारी वकील गिरीश सरवदे,
इस्माईल बेसकर,विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड.के.एस.हल्ले,ॲड.ए.एम.बनसोडे, ॲड.पी.आर.शहा,ॲड.विजय हर्डीकर, ॲड.व्ही.बी. पाटील,ॲड.अनिल मंगरुळे, ॲड.सुनील बोराळकर,ॲड.एस.जी.वंगे, ॲड.उमाकांत पायमल्ले,ॲड.सम्राटसुबल एखंडे,ॲड.सिद्धाराम उडचाण व इतर विधीज्ञ तसेच अक्कलकोट न्यायालयाचे
सहा.अधिक्षक किशाेर रणदिवे, न्यायालयीन कर्मचारी अर्चना मागनुर, अमित खिस्ती,योगीराज किणगी,शरण आळगुंडगी, नदाफ, स्वप्नील मोरे, सचिन जाधव,इमाम चौधरी,प्रकाश कुंभार आदी उपस्थित होते.

या लोकअदालतीस न्यायालयीन कर्मचारी, बॅंक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, महावितरण कर्मचारी मोठया संख्येने पक्षकार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!