---Advertisement---

मराठी अभिनेत्री माधवी निमकर हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चुंगीत येणार

By team
On: November 6, 2024 9:43 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट वृत्तसंस्था 

अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील युवा नेते जय नारायण साळुंके मित्र परिवारातर्फे ‘आपलं गाव आपली दिवाळी’ या उपक्रमांतर्गत हळदी कुंकू व सांस्कृतिक ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता चुंगी येथील शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

 

या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवीताई कल्याणशेट्टी तसेच पूजाताई कल्याणशेट्टी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जयनारायण साळुंके व कोमल साळुंके यांनी दिली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या स्टार प्रवाह मालिकेच्या फेमस मराठी अभिनेत्री माधवी निमकर (शालिनी)  या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि सेलिब्रेटी अँकर आर. जे अक्षय हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जयनारायण साळुंके मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!