---Advertisement---

सोलापूर जिल्ह्यात “या” तहसीलदारांच्या बदलीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव

Follow Us:
---Advertisement---

 

 

पंढरपूर, दि.१९ : पंढरपूरच्या वादग्रस्त तहसीलदार वैशाली वाघमारे यांची अखेर पुणे जिल्ह्यातील खेड येथे बदली करण्यात आली आहे.याबाबतचे आदेश प्रशासनाने काढले
आहेत. वैशाली वाघमारे यांच्या कार्यकाळात अवैध वाळू उपसा करण्याचे प्रमाण वाढले होते.जनतेची कामे होत नव्हती.
त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षासह अनेक संघटनांनी त्यांच्या बदलीची मागणी केली होती.
या तहसीलदार आमदार आणि पत्रकारांचे फोन देखील
उचलत नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या होत्या.या पार्श्वभूमीवर चौकशी होऊन त्यांची बदली करण्यात आली आहे.नवीन तहसीलदार कोण येणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तहसीलदार वाघमारे यांच्या बदलीनंतर पंढरपूरमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने नामदेव पायरी जवळ पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!