---Advertisement---

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची उद्या अक्कलकोटला सभा

By team
On: November 12, 2024 9:59 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, वृत्तसंस्था 

अक्कलकोट विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता कांदा बाजार अक्कलकोट येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जाहीर सभा होणार आहे.

काँग्रेसची पहिली मोठी जाहीर सभा होणार आहे.  या सभेच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू असून या सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता आहे. या सभेला जिल्हा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे व शहराध्यक्ष रईस टिनवाला यांनी दिली.

या सभेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित  राहावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!