---Advertisement---

अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण करून खंडणी वसूल

By team
On: December 11, 2024 5:58 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था 

अभिनेता मुश्ताक खान यांचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे बॉलिवूड क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. एका कार्यक्रमाचं नाव सांगून मला बोलावण्यात आलं आणि त्यांचं अपहरण झालं.  तसेच अपहरण करणाऱ्या टोळीने मुश्ताक यांची सुटका करण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणीही गोळा केली. मुश्ताकला 20 नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये एका अवॉर्ड शोसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी त्याला आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. यानंतर त्यांना विमानाचे तिकीटही पाठवण्यात आले. दिल्लीत उतरल्यावर त्याला कारमध्ये बसवून दिल्लीच्या बाहेरील बिजनौरजवळ कुठेतरी नेण्यात आले.

दरम्यान अपहरणकर्त्यांनी मुश्ताक खानला सुमारे 12 तास कैद केले. त्याच्याकडून खंडणी म्हणून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुश्ताक आणि त्याच्या मुलाच्या बँक खात्यातून दोन लाखांहून अधिक रुपये काढले. जेव्हा अभिनेत्याने सकाळच्या अजानचा आवाज ऐकला तेव्हा त्याला समजले की जवळच एक मशीद आहे. अशा स्थितीत तो तेथून निसटला आणि पोलिसांच्या मदतीने घरी परतला असल्याची माहिती यादव यांनी दिली.

मी स्वत: बिजनौरला जाऊन अधिकृत एफआयआर दाखल केला. आमच्याकडे विमानाची तिकिटे, बँक खाती आणि विमानतळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आहे, अगदी त्याला जिथे ठेवले होते ते घरही अशी सगळी ओळखही तो करु शकतो.’  असे देखील यांनी सांगितले.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!