---Advertisement---

नामवंत हॉटेल व्यवसायिक व उद्योगपती महिबूब शेख यांचा सेनेत प्रवेश

On: December 23, 2020 3:41 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) : तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील नामवंत हॉटेल व्यवसायिक व उद्योगपती महिबूब शेख यांनी ना.शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथे बुधवारी शिवसेनेत आपल्या समर्थकांसह प्रवेश केले.

ना.शंभूराजे देसाई हे सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता महिबूब शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केले. त्यांना ना.देसाई यांनी प्रवेश दिले. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसैनिक महिबूब शेख यांचा पक्षात प्रवेश दिल्याचे ना.देसाई यांनी सांगून त्यांचा सन्मान राखला जाईल, पूर्वी सेनेत साबीरभाई शेख होते, आता महिबूबभाई शेख सेनेत आल्याचा आनंद असून त्यांच्या पाठिकशी सेना खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यांनी देखील पक्ष वाढविण्याचे काम करुन शहर व विधानसभा मतदारसंघज्ञतील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेनो पोहोचेल याकरिता कार्यरत रहावेत असे ना.देसाई यांनी सांगून आगामी निवडणुकीकरिता सज्ज रहावेत असे आवाहन तमाम शिवसैनिकांना केले आहेत.

यावेळी बोलताना महिबूब शेख म्हणाले, आता शिवसैनिक झालो आहे, या अगोदरच सेनेत यायला पाहिजे होते. पण तो योग आता आला आहे. सेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कोणतेही अपेक्षा न करता कार्यरत राहू असे शेख यांनी सांगून अनेकजण अल्पसंख्याक समाजाती सेनेत येण्यास इच्छुक आहेत ते देखील लवकरच सेनेत येतील. आता संजय देशमुख असो, योगेश पवार असो यांच्या खांद्याला खांदा लावून सेनेच्या प्रत्येक कार्यात पुढे राहू असे यावेळी महिबूब शेख म्हणाले.

यावेळी  तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख, प्रा.सुर्यकांत कडबगावकर, प्रविण घाटगे, शहर प्रमुख योगेश पवार, उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, सैपन पटेल, इस्माईल जमादार,  महिबूब शेख, रजाक सय्यद, महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षा चव्हाण, शहर प्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुंभार, युवा सेनेचे विनोद मदने, उमाकांत साळुंके आदीजण उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!