---Advertisement---

अन्नछत्र परिसरातील विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान : ना. शंभूराजे देसाई

On: December 23, 2020 4:17 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पूत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी भाविकांकरिता केलेल्या विविध सोयींमुळे अतिशय प्रसन्न व मानसिक समाधान मिळत असल्याचे मनोगत राज्याचे गृह व उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आले असता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने ना.देसाई यांचा सत्कार ‘श्रीं’ची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ना.देसाई हे बोलत होते.

यावेळी तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख, ना.देसाई यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद माळी, प्रा.सुर्यकांत कडबगावकर, प्रविण घाटगे, शहर प्रमुख योगेश पवार, उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, सैपन पटेल, इस्माईल जमादार, विकास ग्रुपचे महिबूब शेख, रजाक सय्यद, महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षा चव्हाण, शहर प्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुंभार, प्रसिध्दी प्रमुख बसवराज बिराजदार, खंडू कलाल, युवा सेनेचे विनोद मदने, आरपीआयचे ता.अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्यासह न्यासाचे अप्पा हंचाटे, मुन्ना कोल्हे, संजय कुलकर्णी, महांत स्वामी, समर्थ घाटगे, सिध्दाराम कल्याणी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!