मेष : आज कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबासोबत काही चर्चा होऊ शकतात. आर्थिक बाबींबाबत एखाद्याशी थोडे मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील कामे मंदावण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी असू शकते. आरोग्यात चढ-उतार जाणवतील.
वृषभ : आजचा काळ अनुकूल आहे. तुमच्या विशेष कौशल्यांचा विकास करण्यात चांगला वेळ घालवाल. विद्यार्थी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. कुटुंबातील लोकांना तुमचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त दिनचर्याचा असेल. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक राहून तुमची कामे पूर्ण करा. जुन्या नकारात्मक गोष्टींना वर्तमानावर वर्चस्व गाजवू देऊ नका. जोडीदारासह कुटुंबातील सदस्यांचे पाठबळ मिळेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : सध्याच्या दिनचर्येत समायोजित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. नवीन माहिती मिळविण्यात वेळ जाईल. घरात कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंददायी राहील. नकारात्मक विचारांमुळे नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.
सिंह : आज कठोर परिश्रमाच्या जोरावर परिस्थिती अनुकूल बनवू शकता. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. कोणताही निर्णय घेताना मनाची स्थिरता ठेवा. आरोग्य उत्तम राहिल.
कन्या : आजचा दिवस महिलांसाठी विशेषतः अनुकूल असेल. त्या त्यांच्या क्षमता आणि प्रतिभेच्या माध्यमातून कोणतेही विशेष ध्येय साध्य करू शकतील. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनिकदृष्ट्या घेऊ नये.
तूळ : आज राजकीय संबंध मजबूत होतील. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर तोडगा काढल्याने मोठा दिलासा मिळू शकतो. स्वभावात चिडचिडेपणा आणि नैराश्य येऊ शकते. घरातील वातावरण आनंददायी राहिल.
वृश्चिक : आजचा बहुतांशवेळ आध्यात्मिक कार्यात व्यतित केल्याने मनशांती लाभेल. घरातील वातावरण आनंददायी ठेवण्यात तुमची विशेष भूमिका असेल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागल्याने त्यांचे मनोबल वाढेल.
धनु : आज कौटुंबीक प्रश्नात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. तुमचा अति आत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो, याची जाणीव ठेवा. आरोग्य उत्तम राहील.
मकर : आज तुमचा बहुतांश वेळ वैयक्तिक आणि आवडीच्या कामांत व्यतित कराल. मनात नवीन ऊर्जा अनुभवाल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखाल. व्यवसायातील संपर्क क्षेत्र मजबूत करण्यावर भर द्या. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : सामाजिक कार्यातील सहभागाने तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल. कोणीतरी जवळचा नातेवाईक किंवा मित्र मत्सरातून तुमची छाप खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो याची जाणीव ठेवा. व्यवसायात आर्थिक बाबींबद्दल अधिक विचार करण्याची गरज आहे.
मीन : घराच्या बांधकामाशी संबंधित प्रलंबित काम मार्गी लागेल. कोणत्याही गैरसमजामुळे मनात शंका किंवा निराशेची स्थिती असेल. कार्यक्षेत्रात अधिक समजूतदारपणा आणि दूरदृष्टीने काम करण्याची आवश्यकता आहे.