---Advertisement---

हजारो तरुणांना मिळणार नोकरी : रेल्वेत निघाली मेगा भरती !

By team
On: January 23, 2025 3:24 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक तरुणांनी उच्चशिक्षण घेतले आहे तरी देखील नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत नसताना एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यातून अनेक तरुण तरुणीना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्डाने आज गुरूवारपासून ३२,००० हून अधिक पदांसाठी भरती सुरू केली. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आजपासून RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतात, असे देखील रेल्वे बोर्डाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
सीईएन क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत आरआरबीने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, भरती मोहिमेत ७ व्या सीपीसी पे मॅट्रिक्सच्या लेव्हल १ मध्ये ३२४३८ विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. याशिवाय, उमेदवार २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या अंतिम तारखेनंतर अर्ज शुल्क भरू शकतील. अर्ज दुरुस्तीसाठी सुधारणा विंडोची तारीख आणि वेळ २५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ आहे, असेही रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.

‘परीक्षा शुल्क’
रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या (Open) वर्गातील उमेदवारांना ₹५०० परीक्षा शुल्क भरावे लागेल. CBT मध्ये बसण्यासाठी लागू असलेले बँक शुल्क वजा करून योग्य वेळी ₹४०० परत केले जातील. त्याचप्रमाणे, PwBD/महिला/ट्रान्सजेंडर/माजी सैनिक उमेदवार आणि SC/ST/अल्पसंख्याक समुदाय/आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) च्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹२५० आहे, जे बँक शुल्क वजा केल्यानंतर योग्य वेळी परत केले जाईल.

पात्रता
रेल्वे भरतीसाठी पात्र होण्यास संभाव्य अर्जदारांची वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षांच्या दरम्यान असावी.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!