मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील काही लोक महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याने आता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महापुरुषांच्या अवमानाची चौकशी वगैरे काही नाही, एक विशेष कायदा मंजूर करा, आजामीन पात्र कायदा करा, त्याची चौकशी मोठ्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हायला हवी. याच अधिवेशनात हा कायदा मंजूर करा, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करण्यात आला पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत बोलण्याचे कोणी धाडस करता कामा नये. याबाबत अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा आणि जास्तित जास्त रुपयांचा दंड झाला पाहिजे.
उदयनराजे भोसले म्हणाले की, महापुरुषांच्या अवमानाची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे. तर अशा प्रकरणातील आरोपपत्र किमान 30 दिवसांत दाखल झाले पाहिजे आणि या गुन्ह्याचा निकाल सहा महिन्यांत लागला पाहिजे, असा कायदा केला पाहिजे, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. मग सांगितलं जात की कारवाई केली जाईल. या लोकशाहीत केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने केली जातात. बाहेरून होणारे आक्रमण महाराजांनी परतवून लावले. हे कोणाच्या जोरावर? सर्व समाजाच्या जोरावर स्वराज्याला योग्य दिशा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.