---Advertisement---

वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने ठोकला तळ ; कराड-नांदलापूर फाट्याजवळील घटना

On: January 6, 2021 1:20 PM
Follow Us:
---Advertisement---

कराड : पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा ते नांदलापूर दरम्यान आज बुधवारी पहाटेच्या सुमारास महामार्गाच्या कडेला बिबट्या बसल्याचे वाहनधारकांना दिसून आले.  एवढ्या वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने महामार्गावर तळ ठोकल्याने वाहनधारकांचीही भंबेरी उडाली. बिबट्याने महामार्गावर काही क्षण विश्रांती घेतलयानंतर त्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान, महामार्गवर बसलेल्या बिबट्याचे काही वाहनधारकांनी केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आज बुधवारी पहाटेच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा ते नांदलापूर दरम्यान बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्याला अचानक अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात बिबट्या जखमी झाला. घाबरलेला जखमी बिबट्या हाय वेवर बसून असल्याचे पाहून वाहनधारकांची काही काळ भंबेरी उडाली. बिबट्या महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना महामार्गावर असलेल्या वाहनांच्या रहदारीमुळे व गोंगाटामुळे बिबट्या काही वेळ महामार्गावरच स्तब्ध बसून राहिला. त्यानंतर त्याला मार्ग मिळताच त्याने महामार्गावरून धूम ठोकली. दरम्यान, काही बांधवांनी महामार्गावर वसलेल्या बिबट्याचे मोबाईलमध्ये केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

बिबट्या जवळजवळ अर्धा तास हायवेवरच बसून होता. त्यानंतर तेथील लोकांनी फॉरेस्टला माहिती दिली. परंतु काही वेळात तो बिबट्या शेजारीच असणाऱ्या उसाच्या शेतात पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अजूनही त्या बिबट्या चा शोध सुरू असून तो जखमी आहे का हे पाहण्यासाठी हा शोध सुरू आहे. अशी माहिती वनविभागाने दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!