अक्कलकोट : प्रतिनिधी
मराठा सेवा संघाच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शंकरनगर- अकलूज येथील स्मृतीभवनामध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने ३ दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाची सोमवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमाप्रसंगी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष स्थानी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरषोत्तम खेडेकर हे होते.
दरम्यान मराठा सेवा संघाचे ३०वे राज्यस्तरीय अधिवेशन सुरु होते या मध्ये अनेक वक्त्यांनी विविध विषयावर वाख्याने, परिसंवाद, सांकृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास स्वागत अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख (शिंदे गट) अमोल बापू शिंदे, सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घोगरे, कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, सनी सोनटक्के, प्रकल्प संचालक पुरुषोत्तम कडू, केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे, गंगाधर बनबरे, संदीपपान जाधव, स्नेहा टोणपे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा शिमला बोके, संभाजी ब्रिगेडच्या अॅड. मनोज आखरे, ना.तु. वारकरी परिषदेचे महा सचिव ज्योती राजे जाधव, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे, सिने कलावंत किरण माने, शिवशाहीर राजेंद्र कांबळे, अॅड. मिलिंद पवार, जिजाऊ रथ यात्रेचे मुख्य समन्वयक प्रा. अर्जुन तनपुरे, रथ यात्रा प्रमुख सौरभ खेडेकर, डॉ. मनोहर तुपकर, धनाजी माने, जिल्हा सचिव हेमलता मुळीक, मनोरमा लावंड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वनिता कोरटकर, प्रियाताई नांगणे, शारदा चव्हाण, मनीषा जाधव, सुवर्णा घोरपडे, रविंद्र पवार, अशोकराव रणवरे, दिगंबर मिसाळ, नवनाथ कोडक, सिद्धेश्वर नागटिळक, डॉ. विश्वनाथ आव्हाड, शिवाजी शिंदे, बाळासाहेब पराडे, डॉ. अमोल माने, सचिव राजेंद्र मिसाळ, निनाद पाटील, श्री क्षेत्र अक्कलकोट चे गो रक्षक प्रथमेश पवार, शुभम कामनुरकर, विजय माने, प्रवीण घाडगे, आकाश सूर्यवंशी, आकाश गडकरी, प्रसाद मोरे, सागर जाधव, शिवराज स्वामी, सरफराज शेख, बाळासाहेब देसाई बाबलादकर, प्रशांत साठे, महांतेश स्वामी, श्री गुरव, यश विभूते आदिजन बहुसंख्येने उपस्थित होते.