---Advertisement---

महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा गोंधळ ; शरद पवारांच्या सोशल मिडीया टीमने केली चूक !

On: January 8, 2021 9:41 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे टि्वट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी केले. त्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये गोंधळ उडाला. अखेर ही पवारांच्या सोशल मिडीया टीमची चूक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर हे टि्वट दुरुस्त करण्यात आले.

कोठेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन शिवसेनेचे नेते संतप्त झाले आहेत. कोठेंची सेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही सेना नेत्यांनी जाहीर केले होते. यादरम्यान महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडल्याचे वृत्तही आले. मात्र सायंकाळी शरद पवार यांनीच कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्याचे टि्वट केले. कोठे समर्थकांना आनंद झाला तर सेना नेत्यांमध्ये गोंधळ उडाला. पवारांच्या सोशल मिडीया टीमला हे टि्वट दुरुस्त करण्यास सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!