---Advertisement---

दुधनीत नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड

On: January 9, 2021 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---

दुधनी (गुरुराज माशाळ) : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील दुधनी नगर परिषदेच्या विविध समिती सदस्य व सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर, पाणीपुरवठा सभापतीपदी शिवानंद माड्याळ, महिला व बालकल्याण सभापतिपदी सुनंदा चिंचोळी, मागासवर्ग, कल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीदेवी बसवनकेरी यांची निवड झाली.

दुधनी नगर परिषदेत काँग्रेसची बहुमत आहे. त्यामुळे या सर्व निवडी बिनविरोध झाल्या.

स्थायीच्या सदस्यपदी विजयकुमार मानकर, सुनंदा चिंचोळी, श्रीदेवी बसवनकेरी, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सदस्यपदी सोमण्णा ठक्का, शबाना मोमीन, उदयकुमार म्हेत्रे, महेश पाटील, पाणीपुरवठा नियोजन विकास व बांधकाम समितीच्या सदस्यपदी अन्नपूर्णा पाटील, गुरुशांतप्पा परमशेट्टी, चांदसाब अ.रहेमान हीप्परगी, अतुल मेळकुंदे, महिला व बालकल्याण स्वास्थ्य समितीच्या सदस्यपदी सुषमा धल्लू, संगीता पाटील, सुवर्णा पाटील, अतुल मेळकुंदे, मागासवर्ग कल्याण समितीच्या सदस्यपदी ललिता गद्दी, सुशिला गोटे, उदयकुमार म्हेत्रे, महेश पाटील यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार जयंत पाटील यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!