---Advertisement---

मुंडे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

On: January 14, 2021 2:36 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राज्यातील राजकारण तापले आहे. मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच पक्षप्रमुख शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत त्यावर पक्ष म्हणून त्वरित निर्णय घेऊ, असे सांगत कारवाईचे संकेत दिले आहेत.

त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाबाबत माझ्याशी भेटून सविस्तर माहिती दिली. त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यातून काही तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली. अशा प्रकारची घटना होईल असा अंदाज असल्याने धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयातून न्यायालयीन आदेश प्राप्त केला होता.

पण, जे आरोप झाले ते गंभीर स्वरुपाचे असल्याने एक पक्ष म्हणून त्यावर तातडीने विचार करण्याची गरज आहे.

मी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहे. त्यांना धनंजय मुंडेंच्या या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती देणार आहे. त्यांची मते जाणून घेत पुढील कारवाई करण्यात येईल.’ असे स्पष्ट केले.

याचबरोबर शरद पवार यांनी ‘नवाब मलिक यांच्या जावयवार झालेल्या आरोपाबाबतही आपली भुमिका स्पष्ट केली. त्यांनी नवाब मलिकांवर कोणताही वय्यक्तीक आरोप झालेला नाही. जे काही आरोप झालेले आहेत ते त्यांच्या नातेवाईकांवर झाले आहेत. याचबरोबर मलिक तपास यंत्रणांना सर्व सहकार्य करत आहेत. वस्तूस्थिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. तपास यंत्रणांवर माझा विश्वास आहे.’ अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!