---Advertisement---

जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा

On: January 19, 2021 2:06 PM
Follow Us:
---Advertisement---

 सोलापूर  : जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आस्थापनेवर असलेल्यांची माहिती संकलन करण्याचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचा मानस असून संबंधित आस्थापनांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

सेवायोजन क्षेत्र माहितीचा उपयोग योजनाबद्ध आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी केला जात आहे. ही सांख्यिकी माहिती राज्य आणि केंद्र शासनाच्या कामगार विभागाला तिमाहीला सादर केली जाते. वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 हे ऑनलाईन सादर करण्यासाठी यापूर्वी दिलेला आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर (0217-2622113/2722116) यावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!