---Advertisement---

प्रभागात तिरंगी लढत, पण अर्ज बाद झाल्याने २१ वर्षीय तरुणीची थेट बिनविरोध निवड

By team
On: November 22, 2025 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

नांदेड : वृत्तसंस्था

राज्यात सध्या स्थानिक निवडणुकीची धामधूम सुरु असून राज्यातील २४६ नगपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुका होण्याअगोदरच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. अशातच आता नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषद निवडणुकीतून एका तरुणीची नगरसेवक पदी अवघ्या २१ व्या वर्षी बिनविरोध निवड झाली आहे. या तरुणीचे नाव स्नेहा तमशेट्टे असून तिने नगरसेवक पदी झालेल्या बिनविरोध निवडणुकीची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.

या निवडणुका पार पडण्याआधी महाराष्ट्रात जवळपास १०० ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. यामुळे २१ वर्षांच्या तरुणी स्नेहा तमशेट्टे ही महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका बनली आहे. मुखेडमधील प्रभाग क्रमांक 4 हा महिला ओबीसीसाठी राखीव आहे. या प्रवर्गात भाजपाने स्नेहा तमशेट्टे यांना उमेदवारी दिली होती.

खरंतर या प्रभागून काँग्रेस आणि दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पण अर्जाच्या छाननीवेळी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. स्नेहा यांची चुलती जयश्री तमशेट्टे या देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण ऐनवेळी त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज पुतणीसाठी माघारी घेतला. यामुळे राजकारणात कधी कुणाला लॅाटरी लागली याची प्रचिती आली आहे.

स्नेहा यांच्या निवडीने भारतीय जनता पक्षाने नांदेड जिल्ह्यात पहिले खाते उघडले आहे. नांदेड जिल्ह्यतील इतर नगर परिषदा सोबतच मुखेड नगर परिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.

कोण आहेत स्नेहा तमशेट्टे?

सर्वसामान्य कुटुंबातील स्नेहा तमशेट्टे ही एक उच्च शिक्षित तरुणी असून तिचे बी फार्मसी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. आपली मुलगी नगरसेविका झाल्याने कुटुंबामध्ये आनंदाच वातावरण आहे. मुखेडमध्ये भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट अशी तिरंगी लढत आहे. नगराध्यक्ष पदासासाठी तिन्ही पक्षांनी प्रबळ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!