मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मुंबईत भाजप-मनसे युती? भाजप आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट

On: January 23, 2021 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकींना अजुन वेळ असला तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. दोन्ही नेत्यांमधील भेट ही राजकीय घडामोड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवरच झाली असल्याचे समजते.

 

दरम्यान, ‘भाजप मुंबई महानगरपालिका निवडणूक ताकदीनं लढणार हे निश्चित आहे. योग्य वेळी योग्य ते उत्तर दिले जाईल. भाजपचा झेंडा हा महनगरपालिकेवर फडकणार हा निश्चय केला आहे. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. आमच्यासोबत जे लोकं येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मनसेसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.

आजची भेट ही केवळ वैयक्तिक आणि मैत्रीची भेट होती. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची भेट घेतली,’ अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली. तसंच, राज ठाकरेंसोबतची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment