---Advertisement---

‘शत्रूच्या गोटात घुसून कार्यक्रम करायचा!’ पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

By team
On: November 5, 2026 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली, वृत्तसंस्था : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० मतांनी विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला. या विजयानंतर पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. एकाच व्यासपीठावर असताना पडळकर यांनी अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचे विधान केले. यावर जयंत पाटील यांनी इतिहासाची आठवण करून देत, अफजलखानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला होता, असे सांगत पडळकरांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ‘पाठ केलेले भाषण केले की असे होते,’ असा टोलाही लगावला.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना पडळकर यांनी, ‘शत्रू कितीही मोठा असला, तरी घाबरायचे नसते. त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो,’ असे प्रत्युत्तर दिले. राजकीय किंवा आर्थिक संकटाचा वेढा पडला, तरी त्यातून बाहेर पडण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यावी, असेही ते म्हणाले. बँकेच्या निवडणुकीतील संघर्षानंतर आता दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमकीने सांगलीचे राजकारण पुन्हा तापले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!