---Advertisement---

थंडीची चाहूल ?… हवामान विभागाचा अंदाज समोर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : यंदा राज्यात थंडीचा जोर किती राहणार, दिवाळीत गारठा जाणवणार की पावसाचे सावट कायम राहणार, याबाबत भारतीय हवामान विभागाचा (IMD) पहिला अंदाज समोर आला आहे. यंदा दिवाळीच्या काळात राज्यात पाऊस किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता नसून आकाश स्वच्छ आणि निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात हळूहळू घट होईल. त्यामुळे दिवाळीत गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे. मात्र, दिवसा तापमान सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

साधारणपणे दिवाळीच्या काळात राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण किंवा हलक्या पावसाची शक्यता असते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी राहणार आहे. पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव हळूहळू वाढणार असून, त्यामुळे राज्यात थंडीची सुरुवात होईल. रात्री आणि पहाटे गारवा जाणवण्यास सुरुवात होणार असली, तरी दिवसा उष्णतेचा फारसा त्रास होणार नाही. एकूणच यंदाची दिवाळी पावसाच्या व्यत्ययाशिवाय आणि आल्हाददायक वातावरणात साजरी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट आतापासूनच गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, शहरी भागातही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पावसाअभावी जलस्रोतांमधील पाणीसाठ्यावर परिणाम झाला असून, आगामी काळात पाण्याची मागणी वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका बाजूला दिवाळीत गुलाबी थंडीची चाहूल लागणार असली, तरी दुसरीकडे राज्यासमोर पाणीटंचाईचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!