---Advertisement---

सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

On: February 2, 2021 8:35 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे. सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले असून आता विद्यार्थ्यांना अखेर विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. ही परीक्षा 4 मे ते 10 जून या काळात ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

4 मेपासून सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा सुरु होणार आहेत. आपण कोरोनातून हळूहळू मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत, असल्याचे रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.

एप्रिलममध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड मिळण्याची शक्यता आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत.

या ठिकाणी आणि अशा प्रकारे पाहता येईल वेळापत्रक

1. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला सर्वात आधी भेट द्या.

2. लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.

3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचे वेळापत्रक दिसेल.

4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

देशभरातील अनेक परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सीबीएसईच्या परीक्षांचाही यात समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!