---Advertisement---

‘नॉट रिचेबल’असलेले मंत्री संजय राठोड थोड्याचवेळात येणार समोर

On: February 23, 2021 12:44 PM
Follow Us:
---Advertisement---

पोहरादेवी: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पुजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. पुजा चव्हाणच्या आत्महत्येमागे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले आहे. मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाणच्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर मंत्री राठोड अलिप्त आहेत. ते समोर आलेले नाही. आज मंगळवारी जवळपास दोन आठवड्यानंतर मंत्री संजय राठोड समोर येणार आहेत. पोहरादेवी येथे मंत्री संजय राठोड थोड्याच वेळात पोहोचणार आहेत. यानंतर ते काय भूमिका मांडतात?याकडे संपूर्ण रज्याचे लक्ष लागले आहे.

पोहरादेवी येथे समर्थकांचा जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. मंत्री संजय राठोड यांच्यासाठी पोहरादेवी येथे होमहवन सुरु आहे. मात्र पोहरादेवीच्या मंहतांनी मंत्री राठोड हे शक्तीप्रदर्शनासाठी नाही तर केवळ दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितले आहे.

सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळे वादात सापडलेले व गेले अनेक दिवस नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समेर येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!