---Advertisement---

संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय; प्रवीण दरेकरांचे आरोप

On: February 23, 2021 3:53 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: बीड जिल्ह्यातील परली येथील तरुणी पूजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पूजा चव्हाणच्या आत्महत्येला मंत्री राठोड जबाबदार असल्याचे आरोप झाले. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून अलिप्त असलेले मंत्री संजय राठोड आज मंगळवारी अखेर समोर आले आहे. यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. यावर भाजप नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो, संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला.

मीडियासमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. ती आत्महत्या आहे की हत्या आहे किंवा मृत्यूचे कारण काय याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. बंजारा समाज संजय राठोड यांना पाठीशी घालत आहे, हे चुकीचे आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!