---Advertisement---

मुकेश अंबानींच्या घराजवळ संशयास्पद जीप आढळली

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : रिलायन्स समुहाचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊस या घराच्या परिसरात एक संशयास्पद गाडी आढळून आली आहे. या गाडीत जिलेटीनचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीतून जिलेटीनच्या कांड्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने घातपाताच्या उद्देश असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ही गाडी कोणाची आहे, त्याचा मालक कोण आहे याचा तपासही पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या घरापासून काही अंतरावर जिलेटीनने भरलेली गाडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवरही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!