---Advertisement---

मोट्याळ गावच्या सरपंचपदी कार्तिक पाटील तर उपसरपंचपदी हलीमा फुलारी यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि २६ : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ गावच्या सरपंचपदी कार्तिक पाटील तर उपसरपंच पदावर हलिमा फुलारी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडला.निवडणूक अधिकारी म्हणून रमेश गुंड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. निवडीनंतर नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्तिक पाटील पॅनलने सलग चार वेळा सत्ता कायम ठेवली. निवडीनंतर बोलताना सरपंच कार्तिक पाटील म्हणाले की, तालुक्याच्या उत्तर भागात मोट्याळ हे एक गाव आदर्श बनवणार आहे. गावातील सर्व रस्ते काँक्रीट केले जातील. आजूबाजूचे अंतर्गत रस्ते, गटारी बनवल्या जातील. तालुक्यात आगामी काळात मोट्याळ गाव रोल मॉडेल म्हणून समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रा.प सदस्य विजय गेजगे, सोनाली सुरवसे, अबुजर पठाण,किसन सुरवसे,नटू जमादार,रऊप मुल्ला,सैपन फुलारी,जिलनी जमादार,हरी सुरवसे,दिनकर काळे,व्यंकट पाटील,विजय शिंदे,जिवन सुरवसे,रजाक ठोकळे, गोविंद सुरवसे,दत्ता शिंदे,कचुर जमादार,मुस्तफा मुल्ला, तजमुल शेख, महादेव सुरवसे,राम चव्हाण आदी उपस्थिती

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!