---Advertisement---

पितापूर सरपंचपदी मोहसीना सगरी तर उपसरपंचपदी सदाशिव पांढर

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील पितापुर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहसीना सगरी यांनी मालनबी नदाफ यांचा एका मताने पराभव केला सरपंच आणि उपसरपंच पदांची निवड सगरी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी सरपंच पदासाठी मोहसीना सगरी आणि मालनबी नदाफ यांनी अर्ज दाखल केले होते यामुळे निवडणूक घेण्यात आली. यावेळी मोहसीना सगरी यांना पाच मते पडली तर प्रतिस्पर्धी उमेदवार मालन नदाफ यांना चार मते पडली एका मताने मोहसीना सगरी विजयी झाले. तर उपसरपंच पदासाठी सदाशिव पांढरे यांची एकच अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली निवडीनंतर नुतन सरपंच सगरी आणि उपसरपंच पांढरे यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी बोलताना सरपंच सगरी यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावचा विकास करणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य शाहीन सगरी विजया व्हनमाने गुलाब देडे श्रीदेवी शिंगाडे खातुनबी फकीर बाबुलाल चिक्कळी आदी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रणोती चंदनशिवे यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!