---Advertisement---

दोड्याळ ग्रामपंचायतिच्या सरपंचपदी विमल गव्हाणे तर उपसरपंचपदी काशिनाथ हळगोदे यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट – दोड्याळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.विमल विलास गव्हाणे व उपसरपंचपदी काशिनाथ निलप्पा हळगोदे यांची बिनविरोध निवड झाली.यामुळे विलास गव्हाणे यांची 35 वर्षाची सत्ता अबाधित राहिली.ग्रामपंचायत निवडणुकीत गव्हाणे पॅनलने वर्चस्व मिळवले होते. सरपंच पदासाठी विमल गव्हाणे व उपसरपंच पदांसाठी काशिनाथ हळगोदे यांचा प्रत्येकी एकच अर्ज आलयाने त्यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस.नंजुंडे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ए.एम.बळुर्गी यांनी काम पाहीले.यावेळी नवनिर्वाचित सदस्य रेवप्पा नडगम, कविता नडगम, सुनंदा अवताडे, स्वामीनाथ कोळी,अश्विनी महाडकर, रिजवाना जमादार उपस्थित होते.

 

नुतन पदाधिकारी यांचे पंचायत समिती सदस्य विलास गव्हाणे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अरूण जाधव, माजी नगरसेवक शिवपुत्र हळगोदे, अल्लीबाशा अत्तार यांनी अभिनंदन केले. निवडी नंतर गुलालाची उधळण करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!